- मध्य रेल्वेची एसी लोकल सुसाट... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

- मध्य रेल्वेची एसी लोकल सुसाट...
- मध्य रेल्वेची एसी लोकल सुसाट...

- मध्य रेल्वेची एसी लोकल सुसाट...

sakal_logo
By

एसी लोकलचे प्रवासी एक कोटीवर
मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद

मुंबई
एसी लोकलच्या तिकीट भाड्यात ५० टक्के कपात केल्यानंतर त्यांना प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२२ दरम्यानच्या नऊ महिन्यांत एसी लोकल प्रवाशांची संख्या एक कोटीवर पोहचली आहे.
--

मुंबईच्या रेल्वे मार्गांवर एसी लोकल सुरू झाली तेव्हा तिचे तिकीट दर पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. एसी लोकलमुळे नियमित सेवाही कोलमडल्याने प्रवाशांचा खोळंबा होत होता; मात्र एसी सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मे २०२२ पासून दैनंदिन तिकीटदरात ५० टक्क्यांपर्यंत कपात केली. त्यानंतर मात्र एसी लोकल प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली. शिवाय मध्य रेल्वेने प्रथम श्रेणी त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक सीझन तिकीटधारकांना सप्टेंबर २०२२ मध्ये अतिरिक्त भाडे भरून वातानुकूलित लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. त्याशिवाय एसी लोकल फेऱ्यासुद्धा वाढवण्यात आलेल्या आहेत. सध्या मध्य रेल्वे सीएसएमटी - कल्याण / बदलापूर / टिटवाळा उपनगरीय विभागात ५६ वातानुकूलित सेवा चालवण्यात येत आहेत.

एसी लोकलची प्रगती!
महिना प्रवासी संख्या
एप्रिल २०२२ : ५,९२,८३६
मे २०२२ : ८,३६,५००
जून २०२२ : ११,०३,९६९
जुलै २०२२ : १०,७९,०५०
ऑगस्ट २०२२ : १२,३७,५७९
सप्टेंबर २०२२ : १३,८२,८०६
ऑक्टोबर २०२२ : १२,७४,४०९
नोव्हेंबर २०२२ : १२,५३,८९६
डिसेंबर २०२२ : १२,३९,४१९