Mon, Feb 6, 2023

पत्रकार संघाकडून वृद्धांना मायेची ऊब
पत्रकार संघाकडून वृद्धांना मायेची ऊब
Published on : 7 January 2023, 10:27 am
वाडा, ता. ७ (बातमीदार) : पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार संघातर्फे बुधावली येथील वृद्धाश्रमात चादरींचे वाटप करून मायेची ऊब दिली. तसेच खाऊचे वाटप करण्यात आले; तर खुपरी येथील आनंद चंदावरकर रिसर्च सेंटर व कल्याणी रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. बुधावली येथे झालेल्या कार्यक्रमास भाजपचे तालुका अध्यक्ष मंगेश पाटील; तर खुपरी येथे झालेल्या कार्यक्रमास चिंचघरचे उपसरपंच तथा शिक्षक सेनेचे पालघर जिल्हा अध्यक्ष मनेश पाटील, डॉ. वैभव ठाकरे उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक पाटील, श्रीकांत भोईर, दिलीप पाटील, वसंत भोईर, अनंता दुबेले, जयेश घोडविंदे आदी उपस्थित होते.