स्टेट ऑलिम्पिक स्पर्धेत अपूर्वा पाटीलला सुवर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टेट ऑलिम्पिक स्पर्धेत अपूर्वा पाटीलला सुवर्ण
स्टेट ऑलिम्पिक स्पर्धेत अपूर्वा पाटीलला सुवर्ण

स्टेट ऑलिम्पिक स्पर्धेत अपूर्वा पाटीलला सुवर्ण

sakal_logo
By

ठाणे, ता. ७ : पुण्याच्या शिवाजी महाराज स्टेडियम येथे पार पडलेल्या महाराष्ट्र स्टेट ऑलिम्पिक स्पर्धेत ठाण्याच्या अपूर्वा पाटीलने ७८ वजनी गटात ज्यूदो खेळात सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत अपूर्वाने पहिल्या फेरीत सोलापूरच्या शिवानी शिंदे, दुसऱ्या फेरीत नागपूरच्या इशिता कापता व तिसऱ्या फेरीत कोल्हापूरच्या सानिका गायकवाड हिच्यावर विजय मिळवला. अपूर्वा पाटील ही सरस्वती क्रीडा संकुल ठाणे येथे प्रशिक्षक देवीसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. अपूर्वाचे वडील महेश पाटील हे मुंबई पोलिस दलात कार्यरत आहेत.