Tue, Jan 31, 2023

ठाण्यात आज महाकरिअर गाईडन्स कार्यक्रम
ठाण्यात आज महाकरिअर गाईडन्स कार्यक्रम
Published on : 7 January 2023, 11:41 am
ठाणे, ता. ७ : आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि प्रेरणा संस्थेच्या वतीने दहावी, बारावीनंतर काय? या विषयावर महाकरिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे शहरातील १२ वी वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही डिसेंबरमध्ये ४ रविवारी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागी झाले होते. हे परीक्षेचे ९ वे वर्षे आहे. या सराव परीक्षेचा निकाल, प्रमाणपत्र वितरण सोहळा आणि १० वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांना भविष्यातील पुढील वाटचालीसाठी महाकरिअर मार्गदर्शन हा कार्यक्रम रविवारी (ता. ८) सकाळी १० ते १२.३० या वेळेत गडकरी रंगायतन नाट्यगृह या ठिकाणी आयोजित केला आहे.