Fri, Feb 3, 2023

घाटकोपरमध्ये पोलिसांचे दंगा काबू प्रात्यक्षिक
घाटकोपरमध्ये पोलिसांचे दंगा काबू प्रात्यक्षिक
Published on : 8 January 2023, 9:33 am
घाटकोपर, ता. ८ (बातमीदार) ः अचानक दंगल झाली की त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस पथके विविध साहित्य घेऊन कशी सज्ज राहतात, याचे प्रात्यक्षिक घाटकोपर पूर्वेतील आचार्य अत्रे मैदानात दाखवण्यात आले. उपनगरातील झोन सातमधील सर्व पोलिस ठाण्यांतील अधिकारी या वेळी उपस्थित होते. सणासुदीचे दिवस तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस पथक सज्ज झाले आहे. या वेळी दंगल झाल्यावर हेल्मेटपासून लाठी, ढाल, रायफल, गॅस गन, फायर ब्रिगेड गाडी, रुग्णवाहिका घेऊन कसे सज्ज होतात, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. पोलिसांचे हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी पूर्व परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती.