पश्चिम रेल्वेची २०.१२ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पश्चिम रेल्वेची २०.१२ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई
पश्चिम रेल्वेची २०.१२ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई

पश्चिम रेल्वेची २०.१२ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ७ : पश्चिम रेल्वेने उपनगरीय लोकल, मेल-एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहीम राबली होती. या मोहिमेंतर्गत गेल्या वर्षभरात २०.१२ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत १३५.५८ कोटींहून अधिकचा दंड वसूल केला आहे. डिसेंबर महिन्यात पश्चिम रेल्वेने बुक न केलेल्या सामानासह विनातिकीट अनियमित प्रवासाच्या १.५८ लाख प्रकरणांद्वारे ९.८७ कोटींचा महसूल मिळवला आहे. एप्रिल-नोव्हेंबर २०२२ या कालावधीत विनातिकीट, अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाची एकूण २०.१२ लाख प्रकरणे आढळून आली आहेत; तर मागील वर्षी याच कालावधीत ११.७६ लाख प्रकरणे आढळून आली. त्या तुलनेत यंदा ७१ टक्के वाढ झाली आहे. एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी वारंवार अचानक तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते. या मोहिमेचा परिणाम म्हणून एप्रिल ते डिसेंबर २०२२ या कालावधीत ३१ हजार ५०० हून अधिक फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.