‘पपेट शो’तून प्रबोधनात्मक जनजागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पपेट शो’तून प्रबोधनात्मक जनजागृती
‘पपेट शो’तून प्रबोधनात्मक जनजागृती

‘पपेट शो’तून प्रबोधनात्मक जनजागृती

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ८ ः नवी मुंबई महापालिकेच्या ईटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सुविधा केंद्रात सर्व प्रकारच्या दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जात आहेत. या केंद्रामार्फत दिव्यांगांसाठीच्या कल्याणकारी योजनांप्रमाणेच सर्वसामान्यांचा दिव्यांगांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठीही प्रयत्न होत आहेत. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून ‘पपेट शो’च्या माध्यमातून जनजागृतीचा प्रयत्न करण्यात आला आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या व खासगी शाळाशाळांमध्ये पपेट शोद्वारे दिव्यांगत्वाबाबत प्रबोधन करण्यात आले. या माध्यमातून मुलांना विविध प्रकारच्या दिव्यांगत्वाची माहिती तसेच त्यांच्या मनामध्ये मित्रांबाबत तसेच समाजातील इतर दिव्यांगांबाबत सहकार्याची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या उपक्रमाला महापालिका क्षेत्रातील सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच याच अनुषंगाने नवी मुंबई महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी दिव्यांगत्वाविषयी जनजागृतीपर पथनाट्यांचेदेखील गेला महिनाभर सादरीकरण करण्यात आले.
--------------------------------------
महिनाभर विविध उपक्रम
ईटीसी केंद्रामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता आर्ट अॅण्ड क्राफ्ट कार्यशाळा घेण्यात आली. तीन टप्प्यांमध्ये स्टेन्सील्स प्रिंट ऑन हँकरचीफ, मंडाला आर्ट, पेबल आर्ट अशा तीन कार्यशाळा घेऊन दिव्यांगांना या कलेचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच जागतिक दिव्यांग दिनी वॉकेथॉन उपक्रमांतून जनजागृती करण्यात आली.