आमदार गणेश नाईक यांनी केली पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार गणेश नाईक यांनी केली पाहणी
आमदार गणेश नाईक यांनी केली पाहणी

आमदार गणेश नाईक यांनी केली पाहणी

sakal_logo
By

पिण्याच्या पाण्याची बचत होणार ः गणेश नाईक
कोपरखैरणे, ऐरोलीतील सांडपाणी प्रक्रिया केंद्राला भेट
तुर्भे, ता. ९ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सी-टेक या आधुनिक प्रणालीचा वापर करून आठ ठिकाणी सिवरेज ट्रीटमेंट प्लांट (एसटीपी) स्थापन करण्यात आले होते. या माध्यमातून शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाणी खाडीमध्ये सोडण्यात येते. या प्रकल्पातील कोपरखैरणे, तसेच ऐरोली येथील केंद्र पालिकेने कार्यान्वित केले असून महापे येथील कारखान्यांना पाच एमएलडी पाणीपुरवठादेखील सुरू झाला आहे. या प्रकल्पाची आमदार गणेश नाईक यांनी सोमवारी (ता.९) पाहणी केली आहे.
नवी मुंबई शहराच्या भविष्यकालीन गरजांचा वेध घेऊन विविध विकास प्रकल्प शहरामध्ये निर्माण झाले आहेत. याच अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेने २००० मध्ये आधुनिक सीटेक तंत्रज्ञानाचा वापर करत एसटीपी केंद्रे उभी केली आहेत. या केंद्रांमधून निर्माण होणारे प्रक्रियाकृत पाणी एनआरआय गृहसंकुल, शहरातील उद्यानासाठी वापरण्यात येत आहे. नवी मुंबई शहराची पुढील तीस वर्षांची अपेक्षित लोकसंख्या वाढ विचारात घेऊन तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एसटीपी केंद्रे सक्षम आहेत. यानंतर आता केंद्र सरकारच्या अमृत मिशन योजनेअंतर्गत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई शहरात प्रत्येकी २० एमएलडी क्षमतेचे दोन टीटीपी प्रकल्प ‌ऐरोली आणि कोपरखैरणे येथे उभे राहिले आहेत. नवी मुंबई शहराची पुढील तीस वर्षांची अपेक्षित लोकसंख्या वाढ विचारात घेऊन तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एसटीपी केंद्रे सक्षम आहेत. या केंद्रांची आमदार गणेश नाईक यांनी पाहणी केली. यावेळी एमआयडीसीमध्ये मागणीच्या तुलनेत होणारा अपुरा पाणीपुरवठा पाहता पुनर्प्रक्रियाकृत पुरवठा करण्यासंबंधीचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घ्यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली.
-------------------------------
८६ किलोमीटरच्या जलवाहिन्या, तीन जलकुंभ
कोपरखैरणे आणि ऐरोली या दोन ठिकाणी टीटीपी प्लांट उभे केले आहेत. यामधून निर्माण होणारे प्रक्रियाकृत पाण्याचे वितरण करण्यासाठी ८६ किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. महापे येथे १.५० दशलक्ष लिटर, रबाळे निबान टेकडी येथे ०.७५ आणि तुर्भे येथे जलकुंभ उभारण्यात आले आहेत. हे जलकुंभ एकमेकांशी जोडण्यात आले आहेत. साधारणपणे १५२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.
-------------------------------
नवी मुंबई शहरातील आरोग्य, शिक्षण, दळणवळण, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, परिवहन, मलनिस्सारण इत्यादी गुणवत्तापूर्ण सोयी-सुविधांसाठी नवी मुंबई शहराचा लौकिक देश-विदेशातही आहे. याचे सर्व श्रेय नवी मुंबईकरांना जाते. भविष्यातही नवी मुंबई शहराच्या विकासाची गती कायम राहणार आहे.
- गणेश नाईक, आमदार, भाजप