रोटरी क्लबकडून कल्याणकर ॲथेलिटसचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोटरी क्लबकडून कल्याणकर ॲथेलिटसचा सन्मान
रोटरी क्लबकडून कल्याणकर ॲथेलिटसचा सन्मान

रोटरी क्लबकडून कल्याणकर ॲथेलिटसचा सन्मान

sakal_logo
By

कल्याण, ता. १० (बातमीदार) : मॅरेथॉन आणि लांब पल्ल्याच्या सायकलिंगसारख्या खेळांकडे फिटनेससाठी बरेच जण वळत आहेत. हौस म्हणून सुरू झालेला प्रवास, अधिक मोठ्या रेसेस व लांब पल्ला पार करण्याकडे होतो. यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या चार कल्याणकरांचा सन्मान एनड्युरन्स अवॉर्ड देऊन करण्यात आला. सलग ६२ दिवस मॅरेथॉनमध्ये धावणारे विशाक कृष्णास्वामी, २४ मॅरेथॉन, १२० हाफ मॅरेथॉन दोन वर्षांत पूर्ण करणारे मधुसूदन भट, चार सुपर बीआरएम तसेच २०२२ मध्ये दहा हजारपेक्षा जास्त अंतर सायकलिंग करणारे डॉ. रेहनुमा आणि विविध लांब पल्ल्यांच्या राईड्ससह २०२२ मध्ये १२ हजार किमी अंतर सायकलिंग करणारे संजय पाटील यांचा यावेळी सन्मान चिन्ह व १० हजार रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. तसेच स्पोर्ट फिजिओथेरपीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या डॉ. श्वेता वारके व डॉ. हेता ठक्कर यांचा तसेच स्पोर्ट मोटीवेटर, लेखक, वक्ते बिजय नायर यांचा व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला.