
विद्या विकास मंडळाची बिनविरोध निवड
वासिंद, ता. १० (बातमीदार) : विद्या विकास मंडळ शैक्षणिक संस्थेची त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी पार पडली. या सभेत सन २०२३ ते २०२५ या कालावधीसाठी सेक्रेटरीपदी रवींद्र शेलार यांची बहुमताने निवड झाली. पुढील तीन वर्षांसाठी व्यवस्थापक कमिटी सदस्य, शालेय समिती सदस्य व विद्या समिती सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यात व्यवस्थापक कमिटी सदस्यपदी सुरेश रोठे, अनंत शेलार, विठ्ठल सातवी, सखाराम निचिते, लडकू पवार, अनंत भोईर, सुरेश काबाडी, देवेंद्र साळुंखे, सुहास दामोदरे, चंद्रकांत तारमळे, राधेश्याम बजाज, अविनाश शेलार यांची निवड करण्यात आली. शालेय समिती सदस्यपदी एकनाथ जाधव, केशव काठोळे यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या शारदा इंग्लिश मीडिअम स्कूल प्रतिनिधीपदावर संग्राम साळुंखे व अनिल महाजन यांची निवड करण्यात आली असून, विद्या समिती सदस्य म्हणून सुनंदा ठाकरे यांची निवड करण्यात आली.