रेती उत्खनन; पिकअप जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेती उत्खनन; पिकअप जप्त
रेती उत्खनन; पिकअप जप्त

रेती उत्खनन; पिकअप जप्त

sakal_logo
By

कासा, ता. १० (बातमीदार) : डहाणूजवळील समुद्रकिनाऱ्यावर नरपड गावाच्या हद्दीत रात्रीच्या अंधारात रेतीउत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार महसूल विभागाने धाड टाकली असता एक पिकअप टेम्पो रेती वाहतूक करत असल्याच आढळले. विनापरवाना रेतीउत्खनन व वाहतूक केल्याचे निदर्शनात आल्यावर हा पिकअप ताब्यात घेत महसूल विभागाचे कोतवाल अजित चुंबलिया यांनी चालकाला गाडी पारनाका पोलिस चौकी येथे नेण्यास सांगितले; पण वाहनचालक रॉकीने अजित यांना दमदाटी करत पळ काढला. अखेर या वाहनाचा डहाणू तहसीलदार अभिजित देशमुख यांच्या इतर अधिकाऱ्यांनी पाठलाग करून वाहन अडवण्यात आले. त्यानंतर डहाणू पोलिस ठाण्याचे अधिकारी नामदेव बंडगर व पोलिस कर्मचारी यांना घटनास्थळी बोलावून वाहन चालकास ताब्यात देण्यात आले. तसेच हा टेम्पो जेसीबीच्या मदतीने पारनाका पोलिस चौकीत जमा करण्यात आला.