अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात व्याख्यान
अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात व्याख्यान

अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात व्याख्यान

sakal_logo
By

विरार, ता. १० (बातमीदार) : अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबीन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही एड्स व इतर आजार या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. एचआयव्ही एड्स समुपदेशक म्हणून कार्यरत असलेले नेताजी निकम हे या व्याख्यानाचे प्रमुख वक्ते होते. एड्स आजाराची कारणे, गैरसमज, प्रतिबंधात्मक उपाययोजना व एड्सच्या रुग्णांचे पुनर्वसन अशा अनेक विषयांवर त्यांनी स्वयंसेवकांना इत्यंभूत माहिती दिली. या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देताना वर्तक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनी अशा व्याख्यानांद्वारे जनजागृती होऊन एड्स रुग्णांबरोबर होणाऱ्या भेदभावाचे उच्चाटन व्हावे, असे प्रतिपादन केले. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. आदिती यादव यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. स्वयंसेवक साहिल तिवारी याने वक्त्यांचा परिचय करून दिला. स्वयंसेविका लक्ष्मी सिंग हिने आभार व्यक्त केले. हा कार्यक्रम राबवण्यासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. शत्रुघ्न फड व प्रा. आदिती यादव यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.