Wed, Feb 1, 2023

ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वे विस्कळीत
ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वे विस्कळीत
Published on : 10 January 2023, 4:45 am
बोईसर, ता. १० (बातमीदार) : डहाणू-वाणगाव स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची रेल्वे सेवा आज (ता. १०) सायंकाळी विस्कळित झाली होती. त्यामुळे पालघर, बोईसर, वाणगाव, डहाणू स्थानकांवर अनेक गाड्या थांबवण्यात आल्या होत्या. अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे गाड्या अर्धा तास उशिराने धावत होत्या. पश्चिम रेल्वे मार्गावरील डहाणू-वाणगाव स्थानकादरम्यान आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्याने विरार - डहाणू दरम्यानची वाहतूक विस्कळित झाली होती. याचा फटका हजारो प्रवाशांना बसला.