डॉ. बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार
डॉ. बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार

डॉ. बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. ११ (वार्ताहर) : आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असणाऱ्या कॅम्प नंबरमधील सुभाष टेकडी चौकात भारतरत्न, संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या जागी ९ फुटांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा सकारात्मक निर्णय बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि पुतळा स्मारक समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
१९९२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समितीच्या पुढाकाराने सुभाष टेकडी चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला होता. बाबासाहेबांची जयंती आणि महापरिनिर्वाण दिवशी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी यांच्यासह विविध पक्षाचे नेते सहभागी होत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांसाठी मोलाचे कार्य केले असून त्यांच्या प्रीत्यर्थ असलेल्या आपल्या भावना व आदर त्यांच्या या पूर्णाकृती पुतळ्याच्यामार्फत व्यक्त करण्यात येतील, या आशेने पूर्णाकृती पुतळ्याची निर्मिती करण्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून लवकरच पुतळा उभारण्याच्या कामास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली.
या बैठकीस माजी जिल्हाधिकारी एस. एस. ससाणे, बाळासाहेबांची शिवसेनेचे शहरप्रमुख रमेश चव्हाण, शहर संघटक नाना बागुल, माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, उपशहरप्रमुख संदीप डोंगरे, माजी नगरसेवक शांताराम निकम, प्रशांत धांडे, पुतळा स्मारक समिती अध्यक्ष अरुण कांबळे, सचिव अरुण काकळीज, खजिनदार सिद्धार्थ सावंत, उपाध्यक्ष रमेश गवई, सहसचिव प्रवीण भगत, अंतर्गत हिशोब तपासणी काशीराव ससाणे, सदस्य भाई रोकडे, डॉ. गोकुळदास अहिरे, सुबोध गोंडाणे, संजय वाघमारे, महेंद्र अहिरे, सचिन काकडे आदी उपस्थित होते.