सायबर क्राईम विषयावर व्याखान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायबर क्राईम विषयावर व्याखान
सायबर क्राईम विषयावर व्याखान

सायबर क्राईम विषयावर व्याखान

sakal_logo
By

ठाणे, ता. ११ (बातमीदार) ः सायबर क्राईमविषयी जनजागृती करण्यासाठी ठाण्यातील ज्येष्ठ नागरिक मध्यवर्ती संस्थेने सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते. या वेळी प्रमुख पाहुणे व वक्ता म्हणून प्रकाश बोरगावकर व सायबर पोलिस अधिकारी रवींद्र भिडे उपस्थित होते. लॉकडाऊनमध्ये सायबर गुन्हेगारी वाढली होती. विविध वित्त संस्थांनी त्याबाबत जागृती सुरू केली असली, तरी आपण आताही सावध राहण्याची गरज आहे. फसवणुकीच्या तक्रारी दररोज दाखल होत असतात. पोलिसांकडून तपास सुरू असतो. गुन्हेगार पकडले जात असले तरी गुन्हे घडणे थांबलेले नाही. यासाठी आपण सावध राहिले पाहिजे. गुन्हेगार कोणत्या परिस्थितीचा कसा फायदा घेतील, हे सांगता येत नसल्यामुळे आपण काळजी घेणे गरजेचे असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेच्या सचिव शुभांगी बावडेकर, अध्यक्ष प्रकाश दिघे, उपाध्यक्ष रवींद्र दळवी व विद्याधर कामंत उपस्थित होते