विभागस्तरीय कबड्डीमध्‍ये संदेश विद्यालयाचे दुहेरी यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विभागस्तरीय कबड्डीमध्‍ये संदेश विद्यालयाचे दुहेरी यश
विभागस्तरीय कबड्डीमध्‍ये संदेश विद्यालयाचे दुहेरी यश

विभागस्तरीय कबड्डीमध्‍ये संदेश विद्यालयाचे दुहेरी यश

sakal_logo
By

घाटकोपर, ता. १२ (बातमीदार) ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने मुंबई विभागस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड हे जिल्हे आणि या जिल्ह्यांतर्गत असणाऱ्या महापालिका क्षेत्रातील प्रथम क्रमांकप्राप्त शाळांचे संघ सहभागी झाले होते. या वेळी ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुल, पार्कसाईट, विक्रोळी (पश्चिम) येथील संदेश विद्यालयाच्या कबड्डीपटूंनी १७ वर्षांखालील मुले या गटाचे विजेतेपद; तर १७ वर्षांखालील मुली या गटात उपविजेतेपद पटकावून दुहेरी यश संपादित केले.
विजेतेपद पटकावणाऱ्या १७ वर्षांखालील - मुले या संघाची लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच या संघांमधील विनय चौहान (इ. ११वी) व समृद्धी म्हांगडे (इ. ११वी) यांची खेलो इंडिया युथ गेम्सच्या राज्यस्तर निवड चाचणीसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून विद्यार्थ्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सुयशप्राप्त विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक सुनील तांबे, शिवाजी कालेकर व सचिन पाष्टे यांचे संस्थेच्या अध्यक्ष पुष्पलता बाळासाहेब म्हात्रे, संस्थेचे विश्वस्त व शाळेचे प्राचार्य राजेंद्र म्हात्रे आणि विश्वस्त मेघा म्हात्रे यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.