संप काळातील मृतांच्या वारसांना अनुंकपावर नोकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संप काळातील मृतांच्या
वारसांना अनुंकपावर नोकरी
संप काळातील मृतांच्या वारसांना अनुंकपावर नोकरी

संप काळातील मृतांच्या वारसांना अनुंकपावर नोकरी

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ : विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या काळात बडतर्फ केल्यानंतर मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी बुधवारी (ता. ११) विभाग नियंत्रकांना सूचना केल्या आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांनी २८ ऑक्टोबर २०२१ ते २२ एप्रिल २०२२ या कालावधीत संप पुकारला होता. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई म्हणून महामंडळाच्या सेवेतून निलंबन, तसेच बडतर्फीची कारवाई केली होती. त्यानंतर निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांनी अनुकंपा तत्त्वावर नोकरीची मागणी केली होती.
एसटी महामंडळाने याबाबत राज्य सरकारला मार्गदर्शन मागितले होते. त्यानुसार आता संपकाळातील मृतक कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाच्या विधी सल्लागारांनीही सकारात्मकता दाखवली असून मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे. हा निर्णय संपादरम्यान निलंबित आणि बडतर्फ झालेल्या कर्मचाऱ्यांनाही लागू राहणार असल्याचेही चन्ने यांनी स्पष्ट केले.