कासा येथे विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासा येथे विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
कासा येथे विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कासा येथे विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

कासा, ता. १२ (बातमीदार) : डहाणू तालुकास्तरीय ५० व्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन कासा येथील आचार्य भिसे विद्यालयात करण्यात आले होते. या प्रदर्शनात तालुक्यातून विविध शाळांमधून ११२ प्रकल्प सादर करण्यात आले होते. दोन दिवस चालणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनाचे उद्‍घाटन आदिवासी सेवक आप्पासाहेब भोये यांनी केले. या वेळी नासाच्या शास्त्रज्ञ डॉ. अपूर्वा जाखडी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला राज्य विज्ञान मंडळ कार्यकारिणी सदस्य अध्यक्ष संतोष पावडे, गटशिक्षणाधिकारी वसंत महाले, महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष संतोष देशमुख, मुख्याध्यापक भरत ठाकूर, अरुण खंबायत, डहाणू तालुका विज्ञान मंडळ अध्यक्ष शशिकांत ठाकूर, रोशनी फाऊंडेशन अध्यक्ष गीता मुच्छाला, पर्यवेक्षक अनघा गायकवाड आदी उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभाग ६३, माध्यमिक विभाग ३२; तर शिक्षक व प्रयोगशाळा परिचर शैक्षणिक साहित्य १७ असे ११२ प्रकल्प विविध शाळांमधून मांडले होते. प्राथमिक व माध्यमिक गटातून प्रत्येकी सर्वसाधारण गटातून ३ आणि एक आदिवासी विभाग व शैक्षणिक साहित्य एक अशा १० प्रकल्पांची निवड जिल्हास्तरावर करण्यात आली आहे.