पार्किंग सुविधा नसलेल्या वाहनांवर कारवाई नको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पार्किंग सुविधा नसलेल्या वाहनांवर कारवाई नको
पार्किंग सुविधा नसलेल्या वाहनांवर कारवाई नको

पार्किंग सुविधा नसलेल्या वाहनांवर कारवाई नको

sakal_logo
By

भाईंदर, ता. १२ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरात नो पार्किंग भागात उभ्या असलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येत आहे, पण ज्या भागात महापालिकेची अथवा खासगी आस्थापनांची पार्किंगची सुविधा नाही. त्याठिकाणी रस्त्यावर उभ्या वाहनांवर कारवाई केली जाऊ नये, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवी व्यास यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
शहरातील रस्त्यांवर विषम व सम तारखेला वाहनांसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. तसेच काही भागात नो पार्किंगचे फलक लावण्यात आले आहेत. या सूचनांचे पालन न करणाऱ्‍या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे, पण अनेक ठिकाणी महापालिकेकडून तसेच खासगी आस्थापनांकडून पार्किंगची सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालये, पोलिस आयुक्तालय, विविध पोलिस ठाणे, शिधावाटप कार्यालय, खासगी रुग्णालये व दवाखाने, बँका आदी ठिकाणी जाण्यासाठी लोकांना नाईलाजास्तव रस्त्यावरच वाहने उभी करावी लागतात. अशा वाहनांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते, शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर अनधिकृत गॅरेज आहेत, वाहन विक्रीची दुकाने आहेत. त्यांची वाहने रस्त्यावर अथवा पदपथावरच उभी केली जातात. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. उलट जे लोक अत्यंत निकडीच्या कामासाठी रस्त्यालगत वाहने उभी करतात त्यांच्यावर मात्र कारवाई केली जाते, असे व्यास यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या समस्येची दखल घेऊन वाहतूक विभागाला योग्य ते निर्देश द्यावेत, अशी विनंती व्यास यांनी पोलिस आयुक्तांना केली आहे.