भंडारी समाजाच्या सचिवपदी जयप्रकाश ठाकुर

भंडारी समाजाच्या सचिवपदी जयप्रकाश ठाकुर

विरार, ता. १२ (बातमीदार) : सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या वसईतील शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज विश्‍वस्त मंडळाच्या सचिवपदी पंचायत समितीचे माजी उपसभापती जयप्रकाश ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. नुकतीच या मंडळाच्या कार्यकारिणीची निवडणूक झाली. २१ कार्यकारिणी सदस्य असलेल्या या मंडळाच्या सचिवपदासाठी २१ पैकी १० मते जयप्रकाश ठाकूर यांना मिळाली; तर त्यांचे प्रतिस्पर्धी नवीन चोरघे यांना ८ मते पडली. उर्वरित ३ जणांनी तटस्थपणाची भूमिका घेतली. त्यामुळे जयप्रकाश ठाकूर निवडून आले आणि संस्थेच्या इतिहासात प्रथमच उत्तर वसईला कार्यवाह पद मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com