Sat, Jan 28, 2023

‘आर्यन’तर्फे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा
‘आर्यन’तर्फे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा
Published on : 12 January 2023, 9:19 am
शिवडी, ता. १२ (बातमीदार) ः गिरगाव येथील आर्यन एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेतर्फे माजी विद्यार्थी, विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा शनिवारी (ता. १४) सायंकाळी चार वाजता गिरगाव येथील आर्यन एज्युकेशन सोसायटीचे न्या. महादेव गोविंद रानडे सभागृहात आयोजित केला आहे. यात माजी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.