गेटवे ऑफ इंडिया येथे उद्यापासून ज्ञानगंगा संगीत महोत्सव

गेटवे ऑफ इंडिया येथे उद्यापासून ज्ञानगंगा संगीत महोत्सव

मुंबई, ता. १२ : एम फॉर सेवा ही चेन्नईत मुख्यालय असलेली आणि ग्रामीण भागातील शिक्षणावर लक्ष केंद्रित करणारी स्वयंसेवी संस्था महाराष्ट्रात आपले शैक्षणिक कार्यक्षेत्र विस्तारण्यास उत्सुक आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून संस्थेच्या वतीने १४-१५ जानेवारीला ‘ज्ञानगंगा संगीत महोत्सव’ गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती शशी व्यास यांनी दिली. या वेळी त्यांच्यासोबत रंगराजन आणि पंचम निषादच्या सुलेखा वाणी उपस्थित होत्या. भारतातील अनेकविध सादरीकरण कलांचा समृद्ध वारसा जोपासण्यावर लक्ष केंद्रित करणारी मुंबईस्थित पंचम निषाद क्रिएटिव्ह ही संस्था या कार्यक्रमासाठी एम फॉर सेवाची इव्हेण्ट मॅनेजमेंट सहयोगी आहे. एम फॉर सेवाच्या ग्रामीण भारताला शिक्षित करण्याच्या कार्यात सहभागी होणाऱ्या कलावंतांमध्ये शंकर महादेवन, रंजनी-गायत्री, कौशिकी चक्रवर्ती, जयतीर्थ मेवुंडी, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, पूजा गायतोंडे, अंतरा नंदी आदी ११ कलावंत आपली कला सादर करून या कामासाठी संस्थेला सहयोग करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com