
बचत गटाच्या माध्यमातून जामघर चकाचक
सरळगाव, ता. १२ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील जामघर येथील महिला बचत गटाच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले. ग्रामीण भागात महिला बचत गटाच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातात. चूल आणि मूल या पलीकडेही महिला म्हणून आपली जबाबदारी आहे, याची समज असलेल्या जामघरमधील महिला बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन गाव स्वच्छ करण्याचा निश्चय करण्यात आला. जागृती महिला बचत गट, वैष्णली महिला बचत गट, समर्थ महिला बचत गट, हिरकणी महिला बचत गट, जिजामाता महिला बचत गट, सावित्रीबाई महिला बचत गट, दिशा महिला बचत गट, सिद्धी महिला बचत गट अशा आठ महिला बचत गटांनी एकत्र येऊन गाव स्वच्छ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सपना भगत, निकिता भगत, अरुणा जामघरे, अनिता जामघरे, कविता जामघरे, जयश्री भगत, तनुजा जामघरे, हर्षदा जामघरे, योगीता भगत, वैशाली जामघरे, अनिता जामघरे, दिव्या जामघरे, अंजली जामघरे, जागृती जामघरे, अरुणा जामघरे, वेबी वाघ या आठ बचत गटांच्या अध्यक्षा व उपाध्यक्षा यांनी एकत्र येऊन गावातील प्रत्येक भाग स्वच्छ करून निघालेला कचरा गावाच्या बाहेर शेतामध्ये पसरवून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.