तक्कात विनापरवाना वृक्षतोडीचा घाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तक्कात विनापरवाना वृक्षतोडीचा घाट
तक्कात विनापरवाना वृक्षतोडीचा घाट

तक्कात विनापरवाना वृक्षतोडीचा घाट

sakal_logo
By

पनवेल, ता.१२(बातमीदार): पनवेल रेल्वे स्टेशनजवळ मोठ्या प्रमाणात बहुमजली इमारतींची कामे सुरू आहेत. यासाठी विकासक अनेक वेळा वृक्ष तोडण्यासाठी परवानगीचे अर्ज करून विनापरवानाच वृक्ष तोड करताना दिसत आहेत. तक्का परिसरातही अशाच प्रकारे आंब्याच्या बागेतील वृक्ष एका खासगी विकसकाने विनापरवाना तोडल्याची तक्रार महापालिकेकडे करण्यात आली आहे.
पनवेल रेल्वे स्टेशन जवळ सेक्टर २० मध्ये तक्का हद्दीत प्लॉट नंबर १७ मध्ये सुमारे पाऊणशे वर्षापासून आंब्याची बाग आहे. येथे धर्मा पगडे हे राखणदार म्हणून काम करीत आहेत. ही जागा एका खासगी विकसकाने विकसित करण्यासाठी घेतली आहे. या जागेत असलेले आंब्याचे मोठे वृक्ष चार दिवसापूर्वी तोडण्यात आले आहेत. मात्र यासाठी पालिकेची परवानगी घेतली नसल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे विशाल पगडे यांनी महापापालिकेकडे तक्रार केली आहे. दरम्यान, या खासगी विकासकाने महापालिकेकडे वृक्ष तोडण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र, त्यांना परवानगी देण्यात आलेली नसताना वृक्षतोड झाल्याने पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांनी गुरुवारी पंचनामा केला आहे.
़़़़़़़़़़़ः---------------------------------
संबंधित विकसकाने आमच्याकडे वृक्ष तोडण्यासाठी अर्ज केला आहे. त्यांना अद्याप परवानगी दिलेली नाही. पण त्याआधीच वृक्ष तोडल्याबद्दलची तक्रार आल्याने पंचनामा केला आहे. याप्रकरणी चौकशीअंती पुढील कारवाई करण्यात येईल.
-संदीप पवार, वृक्ष प्राधिकरण अधिकारी, पनवेल महापालिका