Sun, Feb 5, 2023

बसमध्ये मस्ती केल्याने चार चिमुकल्यांचा जीव वाचला
बसमध्ये मस्ती केल्याने चार चिमुकल्यांचा जीव वाचला
Published on : 13 January 2023, 2:20 am
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १३ : मोरीवली गावातील चार चिमुरड्यांचा जीव त्यांच्या मस्तीखोर स्वभावामुळे वाचला आहे. अपघातग्रस्त बसमध्ये गौरव दिनकर आणि वैष्णव सासे हे आपल्या इतर दोन मित्रांसह प्रवास करीत होते. बस चालकाच्या बाजूला असलेल्या केबिनमध्ये बसलेल्या त्या चौघांची मस्ती सुरू झाली होती. त्यामुळे प्रवाशांनी या चौघा चिमुकल्यांना उल्हासनगरमध्ये बस थांबवून दुसऱ्या बसमध्ये पाठवले होते. याचवेळी त्या बसमधून प्रवास करणाऱ्या आणखीन एका जोडप्याने बसायला जागा न मिळाल्याने त्यांनी बस बदलली होती. त्यामुळे या जोडप्यासह चार चिमुकल्यांचा जीव थोडक्यात वाचला.