‘एक अविरत प्रवास’ आत्मचरित्राचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एक अविरत प्रवास’ आत्मचरित्राचे प्रकाशन
‘एक अविरत प्रवास’ आत्मचरित्राचे प्रकाशन

‘एक अविरत प्रवास’ आत्मचरित्राचे प्रकाशन

sakal_logo
By

विरार, ता. १४ (बातमीदार) : विरंगुळा केंद्र, गिरीज येथे पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी लेखक पीटर फ्रान्सिस नुनीस यांनी लिहिलेल्या ‘एक अविरत प्रवास’ या आत्मचरित्राचे प्रकाशन फादर अँड्र्र्य रॉड्रिग्ज यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला फादर अँड्र्यू यांनी पीटर नुनीस यांच्या दिवंगत मातोश्री कॅथरिन नुनीस यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाची सुरुवात फादर रॉबीन डायस यांच्या प्रार्थनेने व लुसी फर्नांडिस हिच्या स्वागतगीताने झाली. या वेळी फादर फिलीप वाझ, अशोक कोलासो, डॉमणिका डाबरे, थॉमस ब्रिटो, फादर फ्रान्सिस डाबरे, माजी आमदार डॉमणिक घोन्सालविस, कविवर्य सायमन मार्टिन, प्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉ. देवेंद्र पाटील यांची शुभेच्छापर भाषणे झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष फादर अँड्र्यू रॉड्रिग्ज म्हणाले, पीटर यांना परमेश्वराचा फार मोठा आशीर्वाद आहे. ते कुटुंबवत्सल असून समाजनिष्ठही आहेत. त्यांचे देवावरील असीम प्रेम, चर्चनिष्ठा निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ हे मोखाडा या दुर्गम भागात जाऊन तेथील रुग्णांची सेवा करून त्यांनी सिद्ध केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सिबल वाझ हिने मानले; तर सूत्रसंचालन लेस्ली डिसिल्वा यांनी केले.