ऑफिसबॉयचा उत्तराखंडला सायकलने प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑफिसबॉयचा उत्तराखंडला सायकलने प्रवास
ऑफिसबॉयचा उत्तराखंडला सायकलने प्रवास

ऑफिसबॉयचा उत्तराखंडला सायकलने प्रवास

sakal_logo
By

खारघर, बातमीदार
गेल्या काही वर्षांत जंगलात वणवा पेटवून देत निसर्गाची हानी केली जात आहे. पर्यावरण म्हणजे जीवनाचा अविभाज्य घटक आहे. निसर्ग, झाडे, हवा, पाणी हे सर्व पर्यावरणाची रूपे. पर्यावरण वाचेल तरच आपण जिवंत राहू, त्यामुळे निसर्ग वाचवणे आवश्यक आहे. निसर्गाचा ऱ्हास थांबवा हा संदेश घेवून खारघरमधील संजय धोत्रे खारघर ते उत्तराखंड सायकलने प्रवास करत आहे.
सर्वसामान्य कुटुंबात वास्तव्य करणारा संजय धोत्रे हा खारघरमधील ॲक्सिस बँकेत ऑफिस बॉय म्हणून काम करत आहे. भारतात अनेक प्रांत, त्यांचे राहणीमान, बोलीभाषा, संस्कृती आहे; परंतु आपण सामान्य कुटुंब आणि आर्थिक परिस्थितीमुळे जाता येत नाही, अशी भावना प्रत्येकांच्या मनात असते. मात्र, संजयने ते खोटे ठरवून महाराष्ट्र, गुजरात, हरियाना, चंदीगड, पंजाब, हिमाचल असा सहा राज्यांचा प्रवास करत तो उत्तराखंडच्या दिशेने सुरू केला आहे. देशात होणारा पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा याची नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी १ डिसेंबरपासून सायकलने प्रवासाला सुरुवात केली. लहानपणापासून त्याला सायकलची आवड आहे. विशेष म्हणजे सायकल बाजीचा कोणताही अनुभव नसताना तो हा खडतर प्रवास करत आहे. प्रवासादरम्यान त्यांनी सायकल, कॅम्पिंग टेन्ट, मोबाईल, जेवण बनवण्यासाठी छोटा गॅस चुला घेवून प्रवास करत आहे.

थंड वातावरणामुळे गुरुद्वारात बस्तान
हिमाचलवरून त्याने उत्तराखंडच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. आजपर्यंत त्याने २४०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. या भागात पाऊस आणि बर्फवृष्टी आणि थंड वातावरण असल्यामुळे सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत प्रवास करून परिसरात असलेल्या गुरुद्वारामध्ये रात्रीच्या वेळी मुक्काम करून पुढील प्रवास करत आहे.


विविध राज्यांतील विविध संस्कृती बोली भाषा आहे. ज्या ठिकाणी विसावासाठी थांबतो, तेथील नागरिकांची भेट झाल्यावर ते कुठून आणि सायकलने का प्रवास करत आहे, याबाबत विचारणा करतात. निसर्गाचा होणारा ऱ्हास थांबवा हा संदेश घेवून सायकलने भ्रमंती करत असल्याचे सांगताच देशात पर्यावरण जनजागृतीची खूप गरज आहे. जंगल नाहीसे करून त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी केली जात आहे. सरकारने याविषयी कठोर धोरण राबवण्याची गरज असल्याचे नागरिक सांगतात.
- संजय धोत्रे