Tue, Jan 31, 2023

डॉ. फादर टोनी जॉर्ज यांना पुरस्कार जाहीर
डॉ. फादर टोनी जॉर्ज यांना पुरस्कार जाहीर
Published on : 14 January 2023, 11:03 am
विरार, ता. १४ (बातमीदार) : एम. ए. मराठी, मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदकविजेते वसईमधील येशूसंघीय धर्मगुरू डॉ. टोनी जॉर्ज यांना मराठी साहित्य मंडळाचा सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठी साहित्य मंडळाच्या २९ जानेवारीला परभणी येथे होणाऱ्या संमेलनात हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते त्यांना देण्यात येणार आहे.