Sun, Jan 29, 2023

शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
Published on : 14 January 2023, 11:24 am
ठाणे, ता. १४ (वार्ताहर) : ठाण्यातील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या शुभदीप बंगल्याशेजारील लँडमार्क सोसायटी या इमारतीत एका १३ वर्षांच्या शाळकरी मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. इसिका विकास जांगे (वय १३) ही बुधवारी रात्री खेळून घरात आली, त्या वेळी तिचे वडील आणि आजोबा घरातच होते, बेडरूममध्ये गेलेली इसिका बराच वेळ झाला तरी बेडरूमबाहेर आली नाही, त्या वेळी कुटुंबीयांनी ड्युप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी वागळे पोलिस अधिक तपास करत आहेत. इसिका ही आपल्या वडील आणि आजी-आजोबांसोबत राहत होती, तर तिची आई कासारवडवली येथे राहत असल्याची माहिती उपलब्ध आहे.