दुकानातील गल्ल्यावर चोराचा डल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुकानातील गल्ल्यावर चोराचा डल्ला
दुकानातील गल्ल्यावर चोराचा डल्ला

दुकानातील गल्ल्यावर चोराचा डल्ला

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : इयर फोन खरेदीच्या बहाण्याने ऐरोली सेक्टर-९ मधील माय जिओ स्टोअर्समधील ४० हजारांची रोख रक्कम लुटण्यात आली आहे. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.
ऐरोली मुलुंड रोडलगत सेक्टर-९ मध्ये माय जिओ स्टोअर्सचे शॉप आहे. या शॉपमध्ये साहिल गोळे (१९) हा ठाण्यातील तरुण कामाला आहे. गुरुवारी दुपारी साहिल नेहमीप्रमाणे काम करत होता. त्याचवेळी रात्री ९ च्या सुमारास स्टोअरमध्ये एकटाच असताना इयर फोन खरेदीच्या बहाण्याने एक जण शॉपमध्ये आला होता. यावेळी संबंधिताने साहिलशी इंग्रजीमधून संवाद साधत इयर फोन दाखवण्यास सांगितले. तसेच त्याच्याजवळ असलेल्या परदेशातील नोटाही साहिलला दाखविल्या. त्यानंतर त्याने भारतीय चलनातील दोनशे रुपयांची नोट दाखवून ५०० रुपयांची नोट कशी असते असे साहिलला दाखवण्यास सांगितले. त्यामुळे साहिलने ५०० ची नोट दाखवण्यासाठी ड्रॉवर उघडले असता, संबंधिताने साहिलला ढकलून त्यातील ४० हजारांची रोकड घेऊन मुलुंडच्या दिशेने पलायन केले. या प्रकारानंतर साहिलनेदेखील तत्काळ दुकान बंद करून लुटारूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पळून गेल्याने रबाळे पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.