तुमच्यातले वेगळेपण ओळखा ः गणेश शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुमच्यातले वेगळेपण ओळखा ः गणेश शिंदे
तुमच्यातले वेगळेपण ओळखा ः गणेश शिंदे

तुमच्यातले वेगळेपण ओळखा ः गणेश शिंदे

sakal_logo
By

टिटवाळा, ता. १५ (बातमीदार) ः जीवनदीप महाविद्यालयात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती दिनाचे औचित्य साधून ‘आयुष्यावर बोलू काही’ या समाजप्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्याख्यान दिले. विद्यार्थ्यांनी जिजाऊ, शिवराय व स्वामी विवेकानंद यांचा आदर्श घेऊन मोठी स्वप्ने पाहावीत व ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.

मुलींनी सर्व क्षेत्रांत आपले व कुटुंबाचे नाव मोठे करावे यासाठी प्रयत्न करावेत, असे शिंदे म्हणाले. जिजाऊ संस्थेचे संस्थापक नीलेश सांबरे यांनीही मार्गदर्शनपर व्याख्यान केले. त्यांनी सांगितले, विद्यार्थ्यांनो तुम्ही तुमची ध्येय, स्वप्न ठरवा. जिजाऊ कुटुंबाप्रमाणे नेहमी तुमच्यासोबत असेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये कोकण पुढे पाहिजे, त्यासाठी जिजाऊ काम करतेय. जिजाऊ विद्यार्थ्यांसाठी मागेल तिथे वाचनालयाची व्यवस्था करणार असल्याचेही या वेळी त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन जीवनदीप महाविद्यालय व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. याप्रसंगी जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, प्राचार्य के. बी कोरे, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे, ठाणे जिल्हाप्रमुख मोनिका पानवे, सुजय जाधव, वैभव मसने, नौशाद शेख, सरपंच पूजा जाधव, अरविंद मिरकुटे, कांता टेंभे, दीपक जाधव, आदेश चौधरी, दिलीप पालव, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.