विद्यार्थ्यंनी दिला वाहतुकीचा संदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यंनी दिला वाहतुकीचा संदेश
विद्यार्थ्यंनी दिला वाहतुकीचा संदेश

विद्यार्थ्यंनी दिला वाहतुकीचा संदेश

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ ः रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताह शहरात सुरू असून त्या अंतर्गत विविध उपक्रम वाहतूक विभागाकडून घेण्यात येत आहेत. बुधवारी डोंबिवली वाहतूक विभाग, सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन, ए.एस.जी.आय. केअर हॉस्पिटल यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याविषयी संदेश देत जनजागृती केली; तर गुरुवारी वाहतूक पोलिस व रिक्षाचालक यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा अनेक वाहतूक कर्मचारी व रिक्षाचालकांनी लाभ घेतला.

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली बुधवारी सकाळी काढण्यात आली होती. पांडुरंग शाळा ते डोंबिवली वाहतूक उपविभाग कार्यालयादरम्यान ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत प्रकाश विद्यालय, नेरुळकर कॉलेज, मढवी कॉलेज, के. एम. पटेल कॉलेज, अचिवर्स कॉलेज या महाविद्यालयातील सुमारे २५० विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच ए.एस.जी.आय केअर हॉस्पिटलचे ५० कर्मचारी, आर.एस.पी. शिक्षक, डोंबिवली वाहतूक उपविभागातील पोलिस उपनिरीक्षक नवनाथ चव्हाण व पोलिस अंमलदार हजर होते. या रॅलीचे मुख्य आकर्षण हे ओंकार इंग्लिश हायस्कूलचे बँड पथक ठरले. तसेच गुरुवारी वाहतूक विभाग व एम्स हॉस्पिटल यांच्या वतीने वाहतूक पोलिस व रिक्षाचालक यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी हॉ. मिलिंद शिरोडकर, प्रा. शुक्राचार्य गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.