नाट्य महोत्सव प्राथमिक स्पर्धेत मिशन व्हिक्टरी नाटक प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाट्य महोत्सव प्राथमिक स्पर्धेत मिशन व्हिक्टरी नाटक प्रथम
नाट्य महोत्सव प्राथमिक स्पर्धेत मिशन व्हिक्टरी नाटक प्रथम

नाट्य महोत्सव प्राथमिक स्पर्धेत मिशन व्हिक्टरी नाटक प्रथम

sakal_logo
By

वडाळा, ता. १६ (बातमीदार)ः महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मुंबई विभागाच्या वतीने ६८ व्या नाट्यमहोत्सव प्राथमिक स्पर्धा ललित कला भवन, वरळी येथील जांबोरी मैदान येथे १० ते १४ जानेवारीदरम्यान मोठ्या उत्साहात पार पडल्या. स्पर्धेत मुंबई विभागातून १८ नाटके सहभागी झाली होती. कामगार कल्याण केंद्र- शिवडीने सादर केलेल्या महेंद्र कुरघोडे लिखित व अजित भगत दिग्दर्शित ‘मिशन व्हिक्टरी’ या नाटकाने सात पारितोषिकांसह मुंबई विभागात प्रथम क्रमांक पटकावत मंडळाच्या राज्यस्तरीत स्पर्धेत प्रवेश केला.
या स्‍पर्धेत प्रतीक्षा नगर केंद्राच्या ‘बी पॉझिटिव्ह’ नाटकाने द्वितीय; तर रामदूत केंद्राच्या ‘मुक्ती’ या नाटकाने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचा पारितोषक वितरण समारंभ अभिनेत्री व निर्माती सुचित्रा बांदेकर, अभिनेता सुशांत शेलार, एलअँडटीचे जनरल मॅनेजर सुहास घटवाई, मंडळाचे कल्याण आयुक्त रवीराज इळवे यांच्या हस्ते पार पडला. स्पर्धेचे परीक्षण प्रतिभा पाटील, विजय सक्रे, सुनील कदम यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबई विभागाचे सहायक कल्याण आयुक्त सयाजी पाटील, सूत्रसंचालन कामगार कल्याण अधिकारी, नायगाव संतोष साबळे यांनी केले.

यांनी पटकावली पारितोषिके
उत्कृष्ट अभिनय पुरुष
प्रथम नीलेश भेरे (मिशन व्हिक्टरी), द्वितीय- मुकेश जाधव (मुक्ती), तृतीय- रा. स. कोळमकर (सांज सावली)
उत्कृष्ट अभिनय महिला
प्रथम- वैष्णवी देशमुख (मिशन व्हिक्टरी) द्वितीय- संध्या पानसकर (बी पॉझिटिव्ह), तृतीय- प्रणया गायकवाड (तीचं काय चुकलं)
उत्कृष्ट दिग्दर्शन
प्रथम- संदेश गायकवाड (बी पॉझिटिव्ह), द्वितीय- अजित भगत (मिशन व्हिक्टरी), तृतीय- प्रकाश पवार (मुक्ती)