नोकरीच्या बहाण्याने २० लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नोकरीच्या बहाण्याने २० लाखांची फसवणूक
नोकरीच्या बहाण्याने २० लाखांची फसवणूक

नोकरीच्या बहाण्याने २० लाखांची फसवणूक

sakal_logo
By

कळवा, ता. १६ (बातमीदार) : समाज माध्यमांच्या माध्यमातून संपर्क करून नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवून कळवा पूर्व येथे राहणाऱ्या एका तरुणाला २० लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी अज्ञात महिला व तिच्या साथीदारांवर कळवा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. कळवा पूर्व येथे राहणारा विक्रांत चंद्रकांत घटे (वय ४०) याला ७ जानेवारी रोजी एका अनोळखी महिलेने फोन करून नोकरीचे प्रलोभन दाखवले होते. यू-ट्युब व इन्स्टाग्रामच्या माध्यमातून नोकरीसाठी अटी व शर्ती घालून अन्य ग्राहकांचे दाखले देत टेलिग्राम या सोशल मीडिया आयडी संपर्क केला. त्यानंतर महिलेसह तिच्या दोन साथीदार अभिषेक व मंदार यांनी विविध कारणे देत एकूण १९ लाख ८७ हजार रुपयांची मागणी केली. मात्र नोकरी मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच त्याने कळवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.