स्वस्तात दागिने विक्रीच्या प्रलोभनाने तरुणीची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वस्तात दागिने विक्रीच्या प्रलोभनाने तरुणीची फसवणूक
स्वस्तात दागिने विक्रीच्या प्रलोभनाने तरुणीची फसवणूक

स्वस्तात दागिने विक्रीच्या प्रलोभनाने तरुणीची फसवणूक

sakal_logo
By

अंधेरी, ता. १७ (बातमिदार) ः स्वस्तात सोन्याचे दागिने विक्रीच्या प्रलोभनाने एका मॉडेलची तिच्याच मित्राने फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी या मॉडेलच्या तक्रारीवरून हमीद शेख याच्‍याविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. २६ वर्षांची तक्रारदार तरुणी ही मॉडेल असून ती मॉडेलिंगसह इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करते.
दोन वर्षांपूर्वी तिची हमीदशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हमीदने त्याच्याकडे काही सोन्याचे दागिने आहेत, ते दागिने तो मार्केटपेक्षा कमी दरात त्याच्या परिचित लोकांना विकत असल्याचे सांगितले होते. तिला काही दागिने खरेदी करण्यास सांगितले. तिने होकार दिल्यानंतर त्याने तिच्याकडून टप्प्याटप्प्याने सुमारे दीड लाख रुपये घेतले होते. शुक्रवारी त्याने तिला दागिने घेण्यासाठी पायधुनी येथे बोलावले होते. तिथे गेल्यानंतर त्याने दुकान बंद झाल्याचे सांगून तिला विलेपार्ले येथे दागिने घेण्यासाठी जावे लागेल असे सांगितले. त्यानंतर ते ओलामधून विलेपार्ले येथे आले. तिथे आल्यानंतर त्याने कोणाशी तरी मोबाईलवर संभाषण केले होते. त्यानंतर पाच मिनिटांत त्याचा मित्र दागिने घेऊन येतो असे सांगून तो तेथून निघून गेला. बराच वेळ होऊन तो परत आला नाही. त्याचा मोबाईलही बंद होता. हमीदकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने विलेपार्ले पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर हमीद शेख याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. पळून गेलेल्या हमीदचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.