वाड्यात गरजूंना गरम कपड्यांचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाड्यात गरजूंना गरम कपड्यांचे वाटप
वाड्यात गरजूंना गरम कपड्यांचे वाटप

वाड्यात गरजूंना गरम कपड्यांचे वाटप

sakal_logo
By

वाडा, ता. १७ (बातमीदार) : भाजपचे नेते ओमप्रकाश शर्मा यांच्या वतीने मकरसंक्रांत दिनाचे औचित्य साधून खुपरी येथे महिला व पुरुषांना प्रेमाची भेट म्हणून स्वेटरचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीतून गेली ३० वर्षे समाजोपयोगी कार्यक्रम करीत आलो असून गरजूंना नेहमीच सहकार्य करत असतो. कोरोनाच्या कठीण काळात असे कार्यक्रम करण्यास बंदी असल्याने करता आले नाहीत. आता मी सक्रिय सहभाग घेऊन अशी सेवा सुरूच ठेवणार असल्याचे ओमप्रकाश शर्मा यांनी या वेळी सांगितले. तसेच याच दिनाचे औचित्य साधत खुपरी येथे वाडा पोलिस ठाण्याच्या वतीने जनसंवाद अभियान कार्यक्रमाचेदेखील आयोजन करण्यात आले होते. नागरिक आणि पोलिस यांच्यातील दरी कमी होऊन लोकांनी निर्भीडपणे आपल्या तक्रारी घेऊन याव्यात, असा जनसंवाद अभियानाचा उद्देश असल्याचे मत वाडा वाड्याच्या उपनिरीक्षक पल्लवी बाणे यांनी व्यक्त केले याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, बाबाजी काठोळे, तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, पोलिस निरीक्षक दशरथ पाटील, परशुराम सावंत, गोविंद पाटील, सामाजिक कार्यकर्ते रफिक मेमण आदी उपस्थित होते.