प्रत्येक शाळेत हुतात्मा हिराजी पाटील यांची जयंती साजरी होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रत्येक शाळेत हुतात्मा हिराजी पाटील यांची जयंती साजरी होणार
प्रत्येक शाळेत हुतात्मा हिराजी पाटील यांची जयंती साजरी होणार

प्रत्येक शाळेत हुतात्मा हिराजी पाटील यांची जयंती साजरी होणार

sakal_logo
By

मुरबाड, ता. १७ (बातमीदार) : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात १९४२ च्या चले जाव चळवळीत सिद्धगड येथे २ जानेवारी १९४३ रोजी हुतात्मा वीर हिराजी पाटील यांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली. त्यांची जयंती १९ जानेवारी रोजी मुरबाड तालुक्यातील सर्व शाळांमध्ये साजरी होणार आहे. मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती श्रीकांत धुमाळ व प्रहार संघटनेचे अध्यक्ष शरद पाटील यांनी मुरबाड पंचायत समितीच्या शिक्षणाधिकारी यांचेकडे ही मागणी केली होती. त्यानुसार मुरबाड तालुक्यातील शाळांमध्ये वीर हिराजी पाटील यांची जयंती साजरी करण्यात यावी, असा आदेश मुरबाड पंचायत समितीच्या शिक्षणाधिकारी संपदा पानसरे यांनी काढला आहे.