कर्जत उपजिल्‍हा रुग्‍णालयात सुविधांची वानवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जत उपजिल्‍हा रुग्‍णालयात सुविधांची वानवा
कर्जत उपजिल्‍हा रुग्‍णालयात सुविधांची वानवा

कर्जत उपजिल्‍हा रुग्‍णालयात सुविधांची वानवा

sakal_logo
By

कर्जत, ता. १७ (बातमीदार) ः तालुक्यातील गोरगरिबांना उपचारासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालय हाच एकमेव आधार आहे. मात्र येथील असुविधांमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. याप्रकरणी कर्जत विकास संघर्ष समिती आक्रमक झाली असून मंगळवारी उपजिल्हा रुग्णालयावर धडक देत मागणीचे निवेदन सादर केले.
कर्जत तालुका हा अतिदुर्गम डोंगराळ व आदिवासी बहुल भाग आहे. येथील नागरिकांना आरोग्य विषयक आवश्यक असलेल्या प्रथमोपचाराच्या सोयी सुविधा मिळत नसल्याने तसेच ग्रामीण भागातील गोरगरिबांना वेळेत उपचार मिळत नसल्यामुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागते. आरोग्य केंद्रात अनेकदा तज्‍ज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे प्रसूतीसाठी आलेल्या महिलांची हेळसांड होत असल्याचे समितीच्या सदस्यांनी रुग्णालयाच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
लाखो रुपयांची यंत्रसामुग्री उपजिल्हा रुग्णालयात धूळ खात पडली आहे.
कर्जत उपजिल्हा रुग्णालयाने लवकरात लवकर लसीकरण व बूस्टर डोस सुविधा सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कर्जत विकास संघर्ष समितीने निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्यालयीन अधीक्षक माधवी जाधव यांना देण्यात आले.
या वेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी संगीता दळवी, अधिपरिचारीका सविता पाटील, अरुणा येवले, पुनम जगदाळे, आरपीजी फाऊंडेशनचे फिवर क्लिनिक ऑपरेटर विजय भगत तसेच कर्जत विकास संघर्ष समितीचे राजाभाऊ कोठारी, ॲड. कैलास मोरे, ॲड. योगेश देशमुख, विनोद पांडे आदी उपस्थित होते.

वयोवृद्ध बूस्टर डोसच्या प्रतीक्षेत
तीन ते चार महिन्यांपासून लसीकरणाचा तुटवडा असल्याचे कारण देऊन कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील कोविड लसीकरण बंद करण्यात आले आहे आणि ते आजतागायत सुरू न केल्यामुळे काही नागरिकांचे अद्याप लसीकरण झालेले नाही.
लसीकरणासह अनेक वयोवृद्धांचे बूस्टर डोसही झालेले नाही.

कर्जत : उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्यालयीन अधीक्षक माधवी जाधव यांना निवेदन देण्यात आले.