सुरक्षा रक्षकासाठी परप्रांतीयांची भरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुरक्षा रक्षकासाठी परप्रांतीयांची भरती
सुरक्षा रक्षकासाठी परप्रांतीयांची भरती

सुरक्षा रक्षकासाठी परप्रांतीयांची भरती

sakal_logo
By

उरण, ता. १९ (बातमीदार) : जेएनपीटी टाऊनशिप येथे लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त सेझमधील सुरक्षा रक्षकपदासाठी मेळावा घेण्यात आला होता; पण या मेळाव्यात स्थानिक भूमिपुत्रांएेवजी परप्रांतीयांची भरती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्पांसाठी स्थानिकांच्या जमिनी घेणाऱ्या जेएनपीटी प्रशासनाविरोधात संतापाची भावना आहे.
पनवेलमधील बहुउद्देशीय सभागृहात नुकताच रोजगार मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात स्थानिक भूमिपुत्रांना सेझ व इतर प्रकल्पात नोकरीत प्राधान्य मिळाले पाहिजे. तसेच एकही भूमिपुत्र बेरोजगार राहता कामा नये, यासाठी उरणमधील विविध सामाजिक संस्था, संघटना प्रयत्नशील आहेत; मात्र जेएनपीटी प्रशासनाने सेझमधील प्रकल्पांवर परप्रांतीयांची भरती केली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना डावलून झालेल्या भरतीमुळे स्थानिक प्रकल्पग्रस्तांमध्ये जेएनपीटीविरोधात संतापाची भावना आहे.
----------------------------------
सेझमध्ये सुरक्षा रक्षकांची झालेली भरती ही स्थानिक बेरोजगार, भूमिपुत्रांना डावलून झालेली आहे. त्यामुळे या भरतीला आमचा विरोध आहे. उरणमधील स्थानिकांना अगोदर नोकरी मिळाली पाहिजे. त्यामुळे परप्रांतीयांची भरती करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
- प्रमोद ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते, उरण