Wed, Feb 8, 2023

आर. के. कॉलेजमध्ये मल्टी स्पोर्ट्स टर्फ ग्राऊंड
आर. के. कॉलेजमध्ये मल्टी स्पोर्ट्स टर्फ ग्राऊंड
Published on : 18 January 2023, 11:40 am
मुलुंड, ता. १८ (बातमीदार) ः सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळातर्फे विद्यार्थ्यांसाठी मल्टी स्पोर्ट्स टर्फ ग्राऊंडची निर्मिती आर. के. कॉलेजमध्ये करण्यात आली आहे. शिक्षणतज्ज्ञ आणि संस्थेचे अध्यक्ष रमेश खानविलकर यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या खेळामध्ये आवड निर्माण व्हावी आणि त्यांना मनसोक्तपणे खेळ खेळता यावेत, या उद्देशाने या ग्राऊंडची निर्मिती केली असून त्याचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवारी (ता. २०) दुपारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.