डोंबिवलीत विद्यार्थ्याला बेदम मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोंबिवलीत विद्यार्थ्याला बेदम मारहाण
डोंबिवलीत विद्यार्थ्याला बेदम मारहाण

डोंबिवलीत विद्यार्थ्याला बेदम मारहाण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. १८ ः खंबाळपाडा येथील मंजुनाथ महाविद्यालयाच्या बाहेर एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. १७) संध्याकाळी ही घटना घडली. याप्रकरणी फरदीन पटेल व मोहित या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली पूर्वेतील गांधीनगर परिसरात क्रिश मिश्रा हा राहण्यास आहे. मंगळवारी सायंकाळी क्रिश हा महाविद्यालयासमोरील रस्त्याने जात होता. या वेळी मोहित व फरदिन तेथे आले व त्यांनी क्रिशला अडवले. तू त्या मुलीपासून दूर राहा, तुला आता सोडणार नाही, असे ते म्हणत होते. त्यानंतर शिवीगाळ करत दोघांनी क्रिशला बेदम मारहाण केली. ठोशाबुक्क्यांनी मारहाण झाल्याने क्रिशचा एक दात तुटला आहे. क्रिशने आरोपींच्या ताब्यातून सुटका करून घेऊन पुढे गेला. तेव्हाही त्यांनी त्याचा पाठलाग करून लाकडी काठ्यांनी मारहाण केली.