मेंढवन हद्दीत मोठा खैर साठा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेंढवन हद्दीत मोठा खैर साठा जप्त
मेंढवन हद्दीत मोठा खैर साठा जप्त

मेंढवन हद्दीत मोठा खैर साठा जप्त

sakal_logo
By

कासा, ता.१८ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळ मेंढवण गावाच्या हद्दीत वनविभागाच्या कारवाईत मोठा खैरसाठा जप्त करण्यात आला. मेंढवण गावाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात खैर, साग आणि शिसम अशी मौल्यवान झाडे असून त्‍याची मोठ्या प्रमाणात अवैध तोड करून तस्करी केली जाते. यामुळे कासा वनविभागाच्या पथकाने रात्रीची गस्त वाढवली आहे. रात्रीच्‍या वेळी जंगलात संशयास्पद हालचाली दिसून आल्यामुळे वनविभागाचे कर्मचारी जंगलात दबा धरून बसले होते. त्यांना एक आयशर टेम्पोमधून १० ते १२ व्‍यक्‍ती मोठ्या प्रमाणात खैराची लाकडे चोरी करताना आढळून आले. वनविभाग कर्मचाऱ्यांची चाहुल लागताच तस्करांनी अंधाराचा फायदा घेऊन घटनस्थळावरून टेम्पो सोडून पळ काढला आहे. घटनास्‍थळावरून खैर आणि टेम्पो वनविभागाने जप्त केला आहे. खैराची तोड करून तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईत चार लाखाचा टेम्पो व २५-३० हजाराचा माल जप्त केला आहे. पुढील तपास वनविभाग आणि पोलिस करत आहेत.