खारघर मॅरेथॉनची उत्सुकता शिगेला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघर मॅरेथॉनची उत्सुकता शिगेला
खारघर मॅरेथॉनची उत्सुकता शिगेला

खारघर मॅरेथॉनची उत्सुकता शिगेला

sakal_logo
By

खारघर, ता. १९ (बातमीदार) : रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेल्फेअर असोसिएशनच्या विद्यमाने रविवारी (ता. २२) खारघर मॅरेथॉन होणार आहे. या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असून अभिनेता आदिनाथ कोठारे, राजपाल यादव, अभिनेत्री सई मांजरेकर, निर्माता मिलिंद सोमण, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या, पालिका आयुक्त गणेश देशमुख, आमदार महेश बालदी उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
‘एक धाव व्यसनमुक्तीसाठी’ हे घोषवाक्य घेऊन खारघरमध्ये हजारो स्पर्धक धावणार आहेत. खारघरमधील सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून रविवारी (ता.२२) या स्पर्धेला सकाळी सहा वाजता मान्यवरांच्या हस्ते सुरुवात होणार आहे. या मॅरेथॅानमध्ये शाळा, महाविद्यालये, सोसायटी तसेच नवी मुंबई, पनवेलसह इतरही भागांतून हजारो स्पर्धक सहभागी होणार आहेत. स्पर्धेत पुरुष आणि महिला खुला गटासाठी १० किलोमीटर, तर १७ आणि १४ वर्षांखालील मुले आणि मुलींच्या गटासाठी पाच किलोमीटर अंतर असणार आहे. खारघर दौडसाठी ३ तर सीनिअर सिटीझनसाठी २ किमी अंतर ठेवण्यात आले आहे. प्रत्येक गटासाठी रोख पारितोषिक आणि आकर्षक चषक दिला जाणार आहे.
---------------------------
खारघर मॅरेथॅानमध्ये आत्तापर्यंत सतरा हजारांहून अधिक स्पर्धकांची नोंदणी झाली आहे. तसेच जनजागृतीसाठी शनिवारी रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट कॉम्प्लेक्स आणि खारघर सायकलिंग क्लबच्या वतीने बारा वर्षांवरील सर्व स्पर्धकांसाठी पंधरा किलोमीटर सायकल स्पर्धा रंगणार आहे. त्यामुळे स्पर्धकांमध्ये अधिक भर पडणार आहे.
- प्रशांत ठाकूर, आमदार, भाजप