बोगस सोने देऊन व्यावसायिकाची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोगस सोने देऊन व्यावसायिकाची फसवणूक
बोगस सोने देऊन व्यावसायिकाची फसवणूक

बोगस सोने देऊन व्यावसायिकाची फसवणूक

sakal_logo
By

अंधेरी, ता. १९ (बातमीदार) ः बोगस सोने देऊन एका रियल इस्टेट व्यावसायिकाची फसवणूक झाली आहे. दीड किलो बोगस सोने दिल्यानंतर दहा लाख रुपये घेऊन पळून गेलेल्या तिघांविरुद्ध बोरिवली पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. विजयकुमार प्रेमप्रसाद राय आणि जिवीदेवी मनीलाल परमार आणि गोपालकुमार अशी या तिघांची नावे आहेत. त्यात जिवीदेवी ही वयोवृद्ध महिला असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील तक्रारदार महिला बोरिवली परिसरात तिच्या रियल इस्टेट व्यावसायिक असलेल्या पती आणि मुलीसोबत राहते. गेल्या वर्षी तिच्या पतीची दोन व्यक्तींशी ओळख झाली होती. या दोघांनी भाड्याने फ्लॅटसह कार्यालयाची गरज असल्याचे असून ते हाजीअली परिसरात असावे, अशी विनंती केली होती. त्यांनी त्यांना फ्लॅट आणि कार्यालयासाठी जागा मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. गेल्या आठवड्यात त्यांनी त्यांना फोन करून त्यांच्याकडे दीड किलो सोने असून ते सोने तारण ठेवून त्यांना पंधरा लाखांची गरज आहे. त्यामुळे त्यांनी त्यांना मदत केल्यास त्यांना कमिशन देण्याचे प्रलोभन दाखविले होते. त्यांनी पंधराऐवजी त्यांना दहा लाख रुपये दिले. त्यानंतर त्यांच्याकडून दीड किलो सोने घेतले होते. दहा दिवसांत बारा लाख रुपये परत केल्यानंतर सोने परत घेऊन जाऊ असे त्यांनी सांगितले. हा संपूर्ण व्यवहार बोरिवली रेल्वे स्थानकातील बीएमसी पार्किंग लॉटमध्ये झाला होता. तिथे विजयकुमार, गोपाळकुमार आणि एक ६३ वर्षांची वयोवृद्ध महिला जिवीदेवी परमार उपस्थित होते. त्यांनी दिलेले सोने त्यांनी पुन्हा ज्वेलर्स व्यापाऱ्याला दाखविले. या वेळी व्यापाऱ्याने ते सोने बोगस असल्याचे सांगितले. बोगस सोने देऊन या तिघांनी त्यांच्याकडून दहा लाख रुपये घेऊन फसवणूक केली होती. त्यामुळे त्यांनी बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर विजयकुमार, जिवीदेवी आणि गोपालकुमार या तिघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या तिघांचा आता पोलिसांकडून शोध सुरू आहे.