Tue, Jan 31, 2023

मुलुंडमध्ये झेंडावंदन कार्यक्रम
मुलुंडमध्ये झेंडावंदन कार्यक्रम
Published on : 19 January 2023, 9:19 am
मुलुंड, ता. १९ (बातमीदार) ः प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुलुंडमध्ये विविध भागांत झेंडा वंदन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुलुंड पश्चिमेतील शास्त्रीनगर, साईबाबा मंदिरजवळ सकाळी ९ वाजता, अमरनगर, राजीव गांधी चौक येथे ९.२५ वाजता, मुलुंड कॉलनी येथे डॉ. आर. आर. सिंग यांच्या कार्यालयामध्ये सकाळी ९.५० वाजता, संजय गांधी नगर, जवाहर टॉकीजजवळ सकाळी १०.१५ वाजता, स्मिता नगर, डम्पिंग रोड येथे १०.३५ वाजता आणि वैशाली नगरजवळ सकाळी ११ वाजता झेंडावंदनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांचे आयोजन आर. आर. एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. आर. आर. सिंग यांनी केले आहे. सर्व नागरिकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.