Fri, Feb 3, 2023

भांडुपमधील नालेसफाईला सुरुवात
भांडुपमधील नालेसफाईला सुरुवात
Published on : 19 January 2023, 10:45 am
भांडुप, ता. १९ (बातमीदार) ः भांडुप पश्चिमेला एलबीएस मार्गावरील जरीमरी आई मंदिराशेजारी व कुकरेजा कॉम्प्लेक्ससमोरील नाल्यांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात ‘सकाळ’ने ‘भांडुपमध्ये नालेसफाईची मागणी’ या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत नाल्यामधील गाळ व कचरा मशीनद्वारे काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पालिकेतील संबंधितांना तक्रार करूनदेखील दखल घेतली जात नव्हती. मात्र ‘सकाळ’च्या बातमीची दखल घेत नालेसफाई सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.