मुंबई - गोवा मार्गावर भीषण अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई - गोवा मार्गावर भीषण अपघात
मुंबई - गोवा मार्गावर भीषण अपघात

मुंबई - गोवा मार्गावर भीषण अपघात

sakal_logo
By

माणगाव, ता. १९ (वार्ताहर) ः मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. १९ जानेवारीच्या पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास लोणेरे विभागातील रेपोली गावच्या हद्दीत इको कार आणि ट्रक यांच्यात विचित्र अपघात घडला. त्यात नऊ जण जागीच ठार झाले; तर एका चार वर्षांच्या चिमुकल्याचा उपचारांसाठी नेत असताना मृत्यू झाला.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाडहून मुंबईला जाणारा ट्रक व मुंबईहून गुहागरकडे निघालेली इको कार यांच्यात भीषण अपघात झाला. यात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. चार वर्षांच्या चिमुकल्या बाळाला वाचवण्यात यश आले होते. त्याच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू होते. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला जे. जे. रुग्णालयात उपचारांसाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. सध्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कूर्मगतीने सुरू असलेल्या कामावर नागरिक नाराज आहेत. वळण दिशादर्शक बसवले नसल्याने हा भीषण अपघात घडला अशी चर्चा माणगाव तालुक्यात सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण नावले आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेच्या साह्याने मृतदेह माणगाव उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
...
मृतांची नावे अशी
१) अमोल चंद्रकांत जाधव (वय ४०, रा. हेदवी, ता. गुहागर); २) नीलेश चंद्रकांत पंडित (वय ४५, रा. हेदवी, ता. गुहागर) ३) निशांत शशिकांत जाधव (वय २३, रा. विरार- पूर्व) ४) दिनेश रघुनाथ जाधव (वय ३०, रा. हेदवी, ता. गुहागर) ५) स्नेहा संतोष सावंत (वय ४५, रा. कलमबिष्ट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) ६) कांचन काशिनाथ शिर्के (वय ५८, रा. चिपळूण) ७) दीपक यशवंत लाड (वय ६०, रा. कॉटन ग्रीन मुंबई) ८) मुद्रा नीलेश पंडित (वय १२, रा. हेदवी, ता. गुहागर) ९) नंदिनी नीलेश पंडित (वय ४०, रा. हेदवी, ता. गुहागर) १०) भव्य नीलेश पंडित (वय ४, रा. हेदवी, ता. गुहागर) अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेचा अधिक तपास गोरेगाव पोलिस करीत आहेत.