सीएसएमटीचा पुनर्विकास अडीच वर्षांत पूर्ण होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीएसएमटीचा पुनर्विकास 
अडीच वर्षांत पूर्ण होणार
सीएसएमटीचा पुनर्विकास अडीच वर्षांत पूर्ण होणार

सीएसएमटीचा पुनर्विकास अडीच वर्षांत पूर्ण होणार

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया १६ फेब्रुवारी रोजी खुली होणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुढील पाच महिन्यांत काम सुरू करण्यात येणार आहे. पुनर्विकासाचे काम अडीच वर्षांत पूर्ण केले जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची (सीएसएमटी) इमारत हे मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. युनेस्कोने या इमारतीचा समावेश जागतिक ऐतिहासिक वारसा यादीत केलेला आहे. सध्याचा चेहरा कायम ठेवत विमानतळाच्या धर्तीवर प्रवासी सुविधा पुरवण्याचे धोरण या पुनर्विकास प्रकल्पात भारतीय रेल्वेने हाती घेतले आहे. या प्रकल्पासाठी १८१३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पुनर्विकासाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया १६ फेब्रुवारी रोजी खुली होणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुढील अडीच वर्षांत पुनर्विकासाचे काम पूर्ण केले जाणार आहे. पुनर्विकासाचे काम हायब्रिड बील्ड ऑपरेट पद्धतीने करण्यात येणार आहे. यामध्ये रेल्वे ४० आणि खासगीची ६० टक्के गुंतवणूक असणार आहे.
---
अत्याधुनिक सेवा-सुविधा
पुनर्विकासात सीएसएमटी स्थानकातील २.५४ लाख चौरस मीटरची जागा व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध होणार आहे. प्रवाशांसाठी गॅलरी, बसण्याची जागा, कॅफेटेरिया, वाहन तळाची जागा निर्माण करण्यात येणार आहे, तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांचे तिकीट केंद्र स्थलांतरित करून इमारतीचा काही भाग पाडला जाणार आहे. त्याऐवजी समोरील सीएसएमटी स्थानकाची भव्य वास्तू पाहण्यासाठी हेरिटेज गॅलरी उभारण्यात येणार आहे. फलाट क्रमांक १८ मध्ये प्रवेश केल्यानंतर कॅफेटेरिया, प्रवाशांना बसण्याची जागा केली जाणार आहे. स्थानकातील रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ स्टॉल, प्रसाधनगृह व इतर सुविधा या खासगी विकासकाच्या अखत्यारीतच राहणार आहेत.
.....
पुनर्विकासाची वैशिष्ट्ये
- सीएसएमटी स्थानकाचे वैभव जतन केले जाणार
- सर्व प्रवासी सुविधांसह विक्रेते, कॅफेटेरियासाठी जागा, पादचारी पूल रेल्वे स्थानकात येण्या-जाण्यासाठी स्वंत्रण ठिकाणे
- पार्किंगची सुविधा, रूफ प्लाझा आधुनिक सुविधांयुक्त प्लॅटफॉर्म, लिफ्ट / एस्केलेटर/ट्रॅव्हेलेटरची सुविधा दिव्यांगजनांसाठी सुविधा, सौरऊर्जा, जलसंवर्धन- पुनर्वापर, घनकचरा व्यवस्थापन
- एकूण ३६ हेक्टर जागेत पुनर्विकास