
विज्ञान प्रदर्शनात ७५ शाळांचा सहभाग
डोंबिवली, ता. २१ (बातमीदार) : डोंबिवली येथे दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. हे प्रदर्शन पंचायत समिती कल्याण शिक्षण विभागामार्फत गार्डन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, डोंबिवली येथे आयोजित करण्यात आले होते. तालुक्यातील ४३ प्राथमिक आणि ३२ माध्यमिक अशा एकूण ७५ शाळांनी विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदवला होता. विज्ञान प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी मुख्य मान्यवर म्हणून राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकारी मीनाक्षी गागरे, गटशिक्षणाधिकारी रूपाली खोमणे, शिक्षण विस्तार अधिकारी विजया नाईकवाडी, पंचायत समितीचे रामभाऊ शिरोळे, विठ्ठल भोईर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. बाल वैज्ञानिकेच्या भूमिकेत सातवीचा विद्यार्थी हर्ष चव्हाण याने अध्यक्षस्थान भूषविले; हर्ष चव्हाण याच्या हस्ते या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले होते.