महिला समुपदेशन सल्लागार केंद्राचे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला समुपदेशन सल्लागार केंद्राचे उद्‍घाटन
महिला समुपदेशन सल्लागार केंद्राचे उद्‍घाटन

महिला समुपदेशन सल्लागार केंद्राचे उद्‍घाटन

sakal_logo
By

जव्हार, ता. २१ (बातमीदार) : महिला समुपदेशन सल्लागार केंद्राचे उद्‍घाटन पंचायत समिती जव्हार येथे तहसीलदार आशा तामखडे यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री समाज प्रबोधन व संशोधन संस्था जव्हार यांच्यामार्फत या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. आदिवासी भागात लाभार्थ्यांना महिला समुपदेशनाचा लाभ या केंद्रामार्फत देऊन महिला सक्षमीकरणास संस्थेमार्फत निश्चित मदत होणार आहे. स्वयंसेवी संस्थेने गंभीरतापूर्वक घेतलेली ही जबाबदारी सद्यपरिस्थितीत अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्राचे उद्‍घाटन पंचायत समिती जव्हारचे गटविकास अधिकारी समीर वठारकर, सहाय्यक गटविकास अधिकारी योगेश चंदे, विस्तार अधिकारी यशवंत पराते यांचेही बहुमोल मार्गदर्शन केंद्रास मिळाले.